Published Oct 30, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आपल्या शहरांमधून विविध रंगीबेरंगी पक्षी हळूहळू नाहीसे होत आहेत.
आपण लहानपणी ज्या पक्ष्यांना पाहिलं होतं ते आता फक्त पुस्तकात पाहायला मिळत आहेत.
चमकदार रंग, विरोधाभासी रंगाच्या छटा आणि मधुर आवाज असलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती आकर्षक मानल्या जातात.
लहान, रंगीबेरंगी आणि मधुर पक्ष्यांच्या संख्येत घट होण्याची अनेक कारणे आहेत.
मधुर गाणी गाणारे अनेक रंगीबेरंगी पक्षी शहरीकरणामुळे नामशेष होत आहेत.
अनेक लहान प्रजातींचा समावेश होतो, ज्यांना वाढत्या शहरीकरणाचा सर्वाधिक फटका बसतो.
जंगलं नष्ट होत गेली आणि जंगलावर अवलंबून असलेल्या प्रजातींवर वाढत्या शहरीकरणाचा विशेष परिणाम झाला.
जंगलतोड, शहरीकरण आणि कृषी विस्तारामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.
वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण यांसारख्या कारणांमुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे.
पक्ष्यांची बिनदिक्कतपणे शिकार केली जात आहे.
सततच्या होणाऱ्या हवामान बदलाचा पक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून त्यांची संख्या कमी होत आहे.
शहरीकरण, शेती आणि हवामान बदलामुळे पक्षांना सतत स्थलांतर करावं लागतं. हे देखील त्यांच्या लुप्त होण्याचं कारण आहे.