कोरियन स्टाईल एग रोल; एक हेल्दी ब्रेकफास्ट

Life style

19 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

एका बाऊलमध्ये अंडी फोडा आणि त्यात मीठ, मिरी टाका. चांगले फेटून घ्या.

अंडी फेटणे

Picture Credit: Pinterest

फेटलेल्या अंड्यात कांदा, गाजर, कैबेज किंवा पालक घालून नीट मिसळा.

भाज्या मिसळणे

Picture Credit: Pinterest

नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा आणि थोडं तेल पसरवा.

तवा गरम करणे

Picture Credit: Pinterest

थोडंसं अंड्याचं मिश्रण तव्यावर ओता आणि पातळ थर द्या. जरा शिजू द्या.

पहिला थर

Picture Credit: Pinterest

थोडं शिजल्यावर अंड्याचा थर एका बाजूने सावकाश गुंडाळा. (जसजसं गुंडाळता तसं दुसऱ्या बाजूला जागा सोडा)

रोल करणे

Picture Credit: Pinterest

आता थोडं पुन्हा मिश्रण ओता आणि आधीचा रोल त्यावर सरकवा. याच पद्धतीने पुन्हा पुन्हा थर घालून रोल करत जा.

पुढचा थर

Picture Credit: Pinterest

रोल पूर्ण झाल्यावर थोडा वेळ दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. नंतर थंड झाल्यावर सुरीने स्लाइस करून सर्व्ह करा.

शेवटचं शिजवणे

Picture Credit: Pinterest