हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कृष्णाचा जन्म झाला होता.
यावेळी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
यंदा जन्माष्टमी शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.
जन्माष्टमीपूर्वी घरात काही वस्तू आणणे शुभ मानले जाते. कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घ्या
श्रीकृष्णांना बासरी खूप आवडते. जन्माष्टमीपूर्वी घरामध्ये बासरी आणून ठेवल्याने घरामध्ये कधीही भांडण होत नाही, असे म्हटले जाते.
जर तुम्ही घरामध्ये लड्डू गोपाळाची मूर्ती आणल्यास जन्माष्टमीचा दिवस सर्वांत शुभ मानला जातो.
श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडते. ते घरी आणल्याने घरामध्ये संपत्ती वाढते आणि कुटुंबात शांतीचे वातावरण राहते.
जन्माष्टमीपूर्वी गाय आणि वासराची मूर्ती खरेदी करावी. कारण कामधेनु गायला प्रतीक मानले जाते.
लोणी आणि मिश्रीशिवाय जन्माष्टमीचा सण अपूर्ण आहे. जन्माष्टमीपूर्वी ते घरी आणून त्या दिवशी त्याचा नैवेद्य दाखवा