Published September 4, 2024
BY Divesh Chavan
Pic Credit - Social Media
'या' पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे होतो पाय दुखण्याचा त्रास
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता झाल्यास स्नायू कमकुवत होतात आणि पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सांध्यांना सूज येण्याची शक्यता असते.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे पायांमध्ये वेदना होऊ शकतात.
.
व्हिटॅमिन ई ची कमतरतेमुळे रक्त परिसंचरण बिघडते परिणामी पायांमध्ये वेदना येऊ शकतात.
कॅल्शियमच्या कमीने हाडे कमकुवत होऊन पाय दुखण्याची समस्या वाढते.
सतत पाय दुखण्यास शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता कारणीभूत असते. स्नायू ताठर होतात.
शरीरातील लोहाची कमी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्याचा इशारा असतो. त्यामुळे थकवा तसेच पाय दुखण्याच्या समस्या उद्भवतात.
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये ताण येण्याची अफाट शक्यता असते. ज्यामुळे पायांमध्ये वेदना होतात.