शिळी भाकरी अनेकांना खाऊ वाटत नाही मात्र याचे आरोग्याला अनेक फायदे होत असतात
Picture Credit: iStock
शिळ्या भाकरीत फायबर जास्त प्रमाणात असते, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंची वाढ वाढवते आणि पचनक्रिया सुधारते.
शिळ्या भाकरीतील गुंतागुंतीचे कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही.
थंड झालेल्या भाकरीत 'रेझिस्टंट स्टार्च' तयार होते, जे पचायला वेळ लागतो व त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं.
शिळी भाकरी पोट भरते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते
गर्म हवामानात शिळी भाकरी व ताक/लोणच्यासोबत खाल्ल्यास शरीराचे तापमान संतुलित राहते.
शिळी भाकरी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता नैसर्गिक पद्धतीने बनते ज्यामुळे ती आरोग्यासाठी हानिकारक नसते
शिळी भाकरीत प्रोटीन, फायबर, खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि ती सहज उपलब्ध व स्वस्त असते