Published August 09, 2024
By Shubhangi Mere
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही पहिली भारतीय महिला आहे जिने भारतासाठी दोन पदक ऑलिम्पिकमध्ये मिळवले आहेत.
पीव्ही सिंधू तिच्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये २०१६ मध्ये सिल्वर पदक मिळवले तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक मिळवले आहे.
.
सुशील कुमार हा भारताचा पहिला कुस्तीपटू आहे ज्याने भारतासाठी दोन पदक मिळवले आहेत.
सुशील कुमारने भारतासाठी बींजिंग ऑलिम्पिक २००८ मध्ये कांस्य पदक आणि लंडन ऑलिम्पिक २०१२ सिल्वर मेडल मिळवले आहे.
नॉर्मन प्रिचर्ड हे एक भारतीय ब्रिटिश खेळाडू होते ते भारतासाठी दोन मेडल मिळवणारे पहिले भारतीय ब्रिटिश खेळाडू होते.
नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारतासाठी १९०० मध्ये दोन सिल्वर मेडल जिंकले होते. त्यांनी २०० मीटर धावणे आणि २०० मीटर हर्डलमध्ये सिल्वर मेडल मिळवले होते.
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने भारतासाठी टोकियोमध्ये सुवर्ण पदक मिळवून ट्रॅक फिल्डमध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय ठरला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्रकडून मोठ्या आशा होत्या त्याने पॅरिसमध्ये सिल्वर मेडल मिळवून ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारा पाचवा भारतीय ठरला.
भारतासाठी शूटिंगमध्ये पदक मिळविणारी मनु भाकर ही पाहिली शूटर महिला आहे. तिने भारतासाठी एक नाही तर दोन मेडल मिळवले आहेत.
मनु भाकरने भारतासाठी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी पहिली अथलेटिक्स ठरली आहे. तिने वैयक्तिक स्पर्धेमध्ये आणि मिक्स टीममध्ये कांस्यपदक मिळवले आहे.