Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मराठी कुटुंबामध्ये लग्नात उखाणा घेण्याची प्रथा खूप जुनी आहे.
कोणत्याही सत्यानारायणाची पुजा किंवा लग्नकार्य उखाणा घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.
उखाणा घेण्याच्या या प्रथेबाबत 'किस्सोंकी दुनिया' या इन्टाग्राम अकाउंटवरुन ओमकार सावंत यांनी माहिती दिली आहे.
असं म्हणतात की, आता सारखं पुर्वी नवरा नवरी आणि घरच्यांची ओळख झालेली नसायची.
लग्नानंतर मुलगी हळूहळू संसारात रमायची. नवऱ्याला एकेरी हाक मारणं तिला शक्य नसायचं.
त्यामुळे त्या मुलीला नवरा, सासु सासरे यांच्या विषयी सर्वांसमोर बोलून दाखवणं शक्य नव्हतं.
म्हणूनच संस्कृती परंपरा, रोजच्या घडमोडीतील प्रसंग, म्हणी जोडून काव्यात्मक पद्धतीने उखाणा घेण्याची प्रथा सुरु झाली.
या उखाणा घेतल्याने वरिष्ठांना राग येण्याचं कारण नसायचं आणि नवऱ्याचं नाव घेता आलं याचं त्या मुलीला समाधान मिळायचं.