Published On 28 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - AI Created
प्रत्येक व्यक्तीला अशा ठिकाणी स्थायिक व्हायचे असते जे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल.
त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्याच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था असावी, असं सगळ्यांना वाटतं.
नुम्बेओने 2025 ची सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत अँडोरा अव्वल स्थानावर आहे आणि तो जगातील सर्वात सुरक्षित देश आहे.
या यादीत संयुक्त अरब अमिराती (UAE) ला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सुरक्षित देश मानले गेले आहे.
यानंतर, जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणजे कतार, तैवान, ओमान, आयल ऑफ मॅन, हाँगकाँग, आर्मेनिया, सिंगापूर आणि जपान.
147 देशांच्या यादीत भारत 66 व्या क्रमांकावर तर पाकिस्तान 65 व्या स्थानावर पोहोचला.
यादीत व्हेनेझुएला हा सर्वात धोकादायक देश आहे.
पापुआ न्यू गिनी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात असुरक्षित देश आहे.