Published August 23, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
भारतामध्ये सध्या भालाफेक या खेळाला सध्या पसंती दिली जात आहे, त्यामुळे जगामध्ये टॉप रँकिंगमध्ये १० भालाफेकपटू कोणते? यावर एकदा नजर टाका.
पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी केली आणि आता तो टॉप रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे.
ग्रेनेडाचा स्टार भालाफेकपटू एंडरसन पीटर्स याने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले, त्याचबरोबर एका लहान देशामधील तो एकमेव स्टार खेळाडू आहे.
.
जर्मनीचा मॅक्स डेहनिंग हा २० वर्षीय खेळाडू दिग्गज भालाफेकपटूंची बरोबरी करत आहे. सध्या तो जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानावर आहे, त्याने नुकतेच डायमंड लीग २०२४ मध्ये ८९.४९ मीटरचा भाला फेकून दुसरे स्थान गाठले होते.
झेकिया देशामधील जाकुब वदलेजच हा सध्या पाचव्या स्थानावर आहे, त्याचा आतापर्यत सिझन बेस्ट थ्रो ८८.६५ मीटर आहे.
जर्मनीचा स्टार भालाफेकपटू ज्युलियन वेबर सहाव्या स्थानावर आहे, त्याने डायमंड लीगमध्ये ८८.३७ मीटर चा भाला फेकला होता परंतु त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
केनियाचा ज्युलियस येगो हा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्याचा आतापर्यत सिझन बेस्ट थ्रो हा ८७.७२ मीटर इतका आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशामधील केशोर्न वॉलकॉट हा भालाफेकपटू सध्या जागतिक क्रमवारीमध्ये आठव्या स्थानावर आहे.
फ्रान्स देशामधील तेउरीतेराय तुपाया हा भालाफेकपटू सध्या जागतिक क्रमवारीच्या यादीमध्ये नवव्या स्थानावर आहे.
लुईझ मॉरिसिओ डीए सिल्वा हा एक ब्राझीलमधील ॲथलेटिक्स आहे, त्याचा आतापर्यत सिझन बेस्ट ८५.९१ मीटर इतका आहे.