Published Sept 4, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Canva
गणपतीची भूक भागविण्यासाठी आई पार्वतीने भरवले ‘हे’ पान
कोणतीही बाधा दूर करण्यासाठी नेहमीच गणेश पूजनापासून सुरूवात होते. 7 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होतंय
लहानपणापासूनच आपण गणपतीच्या अनेक रोमांचक कथा ऐकत मोठे होतो. त्यापैकीच एक ही भुकेची कथा
.
गणपती कुबेर देवाजवळ गेले असता सगळे पदार्थ संपूनही त्यांची भूक शांत होत नव्हती, त्यावेळी तुळशीची पानं खायला देऊन आई पार्वतीने त्यांची भूक शमवली
तुळस ही अत्यंत गुणकारी असून ही आयुर्वेदिक वनस्पती अनेक आजारांवर वापरली जाते
अँटीमायक्रोबायल गुणांनी युक्त असणारी तुळस सर्दी खोकल्यावर उत्तम उपाय आहे
तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने अॅसिडीटी आणि गॅससारख्या समस्यांतून सुटका होते
अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे तुळशी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते
उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने त्वचेवर मुरूमं येत नाहीत आणि त्वचा चमकदार होते
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास तुळशीचा उपयोग होतो, तसंच वेट लॉससाठी उत्तम ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुळस खावी, आम्ही कोणताही दावा करत नाही