Lemon Benefits For Skin: लिंबू हा किचनमध्ये हमखास सापडणारा पदार्थ. केवळ स्वाद वाढविण्यासाठीच नाही तर लिंबाचे त्वचेसाठीही उपयोग आहेत. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे केवळ संपूर्ण आरोग्य सुधारत नाही तर त्वचा उजळविण्यासाठी एजंट म्हणूनदेखील काम करते. पण तुमचा चेहरा उजळण्यासाठी लिंबू वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का? ती जर माहीत नसेल तर ब्युटीशियन स्मिता कांबळे यांनी योग्य पद्धत सांगितली आहे, ती तुम्ही वापरून पाहा, मात्र त्याआधी पॅच टेस्ट करा अथवा आपल्या ब्युटिशियनचा सल्ला नक्की घ्या (फोटो सौजन्य - iStock)
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच याला सर्वांगीण आरोग्यासाठी पॉवरहाऊस म्हटले जाते. लिंबू हे त्वचेसाठीदेखील खूप प्रभावी आहे
तुम्ही तुमचा चेहरा उजळण्यासाठी लिंबाचा वापर करत असाल तर तुम्हाला आधी हे जाणून घ्यायचे आहे की त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती आहे
ताज्या लिंबाचा रस काढून थेट काळ्या डागांवर लावा. या पद्धतीमुळे टॅनिंग कमी होते आणि त्वचा उजळ होण्यास मदत मिळते
चेहरा स्वच्छ करण्यासाठी घरीच फेस स्क्रबर बनवायचा असेल तर लिंबाचा रस घ्या आणि त्यात साखर मिसळा. याने चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जातील, चेहरा चमकदार दिसेल
मध आणि लिंबू मिक्स करून चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा. मधामुळे चेहऱ्याला हायड्रेशन मिळते आणि लिंबू चेहरा उजळण्यास मदत करतो. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसते
दह्यात लिंबू मिसळा आणि चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते तर लिंबू त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते
हळदीमध्ये लिंबाचा रस मिसळून लावा. चेहऱ्यावर जळजळ आणि लालपणा येत असेल तर यामुळे कमी होईल