Published Feb 12, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock, pinterest
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा, माघी पौर्णिमा या नावांनी ओळखले जाते.
माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात. असे मानले जाते की, या दिवशी चंद्र देवासह लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.
धर्म शास्त्रानुसार, माघ पौर्णिमेच्या दिवशी दान दक्षिणेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने 32 पट पुण्य मिळते.
माघ पौर्णिमेला काही वस्तू दान करणे अजिबात चांगले मानले जात नाही. असे मानले जाते की या वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मीचा कोप होतो.
हिंदू धर्मात काळा रंग शुभ मानला जात नाही. अशा स्थितीत माघी पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान करू नये. अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
माघी पौर्णिमेला चांदीच्या वस्तू दान केल्यास तुम्हाला. चंद्र दोषाचा सामना करावा लागू शकतो
माघ पौर्णिमेच्या दिवशी चाकू, सुई आणि कैची या गोष्टींचे दान करु नये. या दिवशी मीठ दान करू नये