Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलाय.
पौष पौर्णिमेला शाही स्नान सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. सुमारे 40 लाख भाविकांनी शाही स्नान केले
45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभ मेळ्याला सुमारे 15 लाख विदेश पर्यटकांसह 45 कोटी भाविक येण्याची अपेक्षा
अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाफ असं या महाकुंभ मेळ्याचं वर्णन
यंदा स्वच्छता, सुरक्षा आणि डिजिटल यावर लक्ष असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्याला श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा पवित्र संगम म्हणत शुभेच्छा दिल्या
अध्यात्मिकच नाही यामुळे स्थानिक विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, स्वयं-सहायता गटालाही फायदा होईल
सरकारी महसुलात 25 हजार कोटी, आणि 2 ट्रिलियन आर्थिक स्पिनऑफचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाण्याखालील ड्रोन, AI सक्षम कॅमेरे, एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकही तैनात आहेत