Published 21, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 65.11 टक्के मतदान झाले.
2019 मध्ये मतदानाची टक्केवारी ही 61.4 टक्के इतकी होती.
2024 विधानसभा निवडणुकीमध्ये 2019 पेक्षा 3-4 टक्क्याने जास्त मतदान झाले.
राज्यातील सर्वाधिक मतदानाच्याबाबतीत कोल्हापूरकरांनी बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के मतदान झाले.
नेहमीप्रमाणे मुंबई शहर जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले. तेथे केवळ ५२.०७ टक्के मतदान झाले.
कोल्हापूर – ७६.२५ टक्के, गडचिरोली – ७३.६८ टक्के, जालना – ७२.३० टक्के, सांगली – ७१.८९ टक्के, अहमदनगर – ७१.७३ टक्के,
चंद्रपूर- ७१.२७ टक्के, बुलढाणा – ७०.३२ टक्के, सातारा – ७१.७१ टक्के, हिंगोली – ७१.१० टक्के, परभणी – ७०.३८ टक्के
.
मुंबई शहर- ५२.०७ टक्के, मुंबई उपनगर -५५.७७ टक्के, ठाणे – ५६.०५ टक्के
.
इतर सर्व जिल्ह्यांमध्ये 60 ते 70 टक्क्यांमध्ये मतदान झाले आहे. पुण्यातही मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
.