Written By: Chetan Bodke
Source: Instagram
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
कायमच हटक्या कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या शिवलीचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, अख्ख्या जगात आहे.
शिवलीने इन्स्टाग्रामवर कलरफुल साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे, ज्यामधील तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शिवलीने कलरफुल साडीतील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
शिवालीने कलरफुल साडीवर कॉफी कलरचा स्टायलिश ब्लाऊज कॅरी करत एका पेक्षा एक हटके फोटोशूट केले.
‘इश्क के नाम से डर लगता था.. दिल के अंजाम से डर लगता था.. आशिकी वो ही मेरे साथ हो गयी..’ असे कॅप्शन शिवालीने फोटोंना दिले.
ओपन हेअर, सिंपल मेकअप आणि स्मोकी आईज असा लूक करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
'अगोदरच गरम होतंय इकडे; तू अजून त्यात भर घालू नको...' अशी कमेंट अभिनेत्रीला एका चाहतीने केली.
दरम्यान, शिवालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.