Published Feb 23, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest
हिंदू धर्मात शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक वस्तू देतात.
काही लोक शिवलिंगावर नारळ आणि नारळ पाणी देखील अर्पण करतात. शिवलिंगावर नाराळाचे पाणी अर्पण केल्यास काय होते जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगावर नारळ अर्पण करु नये. कारण नारळाला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीचा संबंध भगवान विष्णूशी आहे.
नारळाची उत्पत्ती समुद्रमंथनापासून झाली असून ती देवी लक्ष्मीचीही मानली जाते. या कारणास्तव नारळ शिवलिंगावर अर्पण करत नाही.
अशी मान्यता आहे की शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण केल्याने भगवान विष्णू नाराज होतात आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.
असेही म्हटले जाते की शिवलिंगावर नारळपाणी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि व्यक्तीच्या अडचणी वाढू शकतात.आपण जमिनीत कलमे देखील लावू शकता
असे मानले जाते की शिवलिंगावर नारळपाणी अर्पण केल्याने पूजेदरम्यान उर्जेचे संतुलन बिघडते. यामुळे नफ्याऐवजी तोटाच होऊ शकतो