हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीला विशेष महत्त्व आहे. यंदा मकरसंक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
मकरसंक्रांतीला खिचडी या नावाने देखील ओळखले जाते. कारण काही ठिकाणी या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे.
काही ठिकाणी साधू संत आणि गरजूंना खिचडी खायला दिली जाते. असे करणे खूप शुभ मानले जाते.
याशिवाय खिचडी खाण्याव्यक्तिरिक्त दान देखील केले जाते.
खिचडीमध्ये तांदूळ, डाळ, तिळ, तूप हे घटक असतात. जे सूर्याशी संबंधित मानले जाते आणि शरीराला ऊर्जा देते.
श्रद्धेनुसार यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. सूर्य देवाला पितृ देवता म्हटले जाते.
मकरसंक्रांतीला खिचडीचे दान केले जाते. ज्यामुळे पितृगुण तृप्त होतात आणि आपल्या पूर्वजांना खूप आशीर्वाद मिळतात.
यामुळे घरामध्ये सुख शांती, आर्थिक लाभ आणि आनंद येतो.
मकरसंक्रांतीला तीळ, गूळ, तिळापासून बनवलेल्या वस्तू तिळाचे लाडू इत्यादीचे दान करतात. तिळाचे दान केल्याने पापाचा नाश होतो.