साधी, सोपी, झटपट तयार होईल पनीर बिर्याणी

Life style

31 October, 2025

Author:  नुपूर भगत

प्रथम पनीरचे तुकडे दही, बिर्याणी मसाला, तिखट, हळद आणि मीठ घालून 15–20 मिनिटे मॅरिनेट करा.

मॅरीनेशन तयार करा

Picture Credit: Pinterest

कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात तमालपत्र, लवंगा, दालचिनी आणि वेलदोडे टाका आणि कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

खडे मसाले

Picture Credit: Pinterest

कांदे परतल्यावर आले-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता. मग टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

कांदा,टोमॅटो परता

Picture Credit: Pinterest

आता मॅरिनेट केलेले पनीर त्याच्या मसाल्यासह घाला आणि 3–4 मिनिटे परतून घ्या. पनीर फार मोडू देऊ नका.

पनीर घाला

Picture Credit: Pinterest

त्यानंतर भिजवलेला तांदूळ, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest

त्यात पाणी घालून कुकरचं झाकण लावा. मध्यम आचेवर 1 शिटी येऊ द्या आणि नंतर गॅस बंद करा.

कुकरमध्ये शिजवा

Picture Credit: Pinterest

झाकण उघडल्यावर हलक्या हाताने बिर्याणी मिसळा. वरून थोडं तूप, तळलेले कांदे आणि पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest