तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.
Picture Credit: Pinterest
फुलकोबी, मटार, गाजर अशा आवडीनुसार भाज्या धुऊन चिरून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करा.
Picture Credit: Pinterest
फोडणीत चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिटे परतवा.
आता त्यात गोडा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ घालून नीट ढवळा.
नंतर भिजवलेले तांदूळ घालून परता, व त्यात २ कप गरम पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
भात शिजल्यावर कोथिंबीर घालून, हवे असल्यास वरून थोडे तूप घालून गरमागरम सर्व्ह करा.
मसाले भातासोबत पापड, गोड अमटं, कांद्याचा ठेचा किंवा दही छान लागते.