मूगडाळ ३-४ तास भिजवा. नंतर हिरव्या मिरच्या व आलं घालून थोडं पाणी वापरून बारीक वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
वाटलेल्या पिठात मीठ आणि लिंबाचा रस घाला. पिठाचा पोत थोडा जाडसर ठेवा.
Picture Credit: Pinterest
ढोकळा पात्राला तेल लावून घ्या. पिठात इनो टाका, मिसळा आणि लगेच साच्यात ओता. १५-२० मिनिटे वाफवून शिजवा.
Picture Credit: Pinterest
टुथपिकने तपासा – ती स्वच्छ बाहेर आली की ढोकळा तयार आहे. थंड झाल्यावर चौकोनी तुकडे करा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. इच्छेनुसार साखर घालू शकता.
फोडणी तयार ढोकळ्याच्या वरून टाका. सर्व ढोकळ्यावर ती समप्रमाणात पसरवा.
शेवटी कोथिंबीर घालून सजवा आणि नारळाची चटणी किंवा हिरवी चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.