एका भांड्यात २ अंडी फोडा, त्यात मीठ आणि मिरी टाका आणि चांगले फेटा.
Picture Credit: iStock
तवा गरम करून त्यावर थोडं तेल टाकून मैद्याचा पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
पराठा तव्यावर असताना त्यावर फेटलेले अंडं ओता आणि हलक्या हाताने पसरवा. थोडं तेल घालून दोन्ही बाजूंनी परतून घ्या.
अंडा शिजल्यावर त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडा लिंबाचा रस शिंपडा.
तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस, मियोनीज किंवा ग्रीन चटणी लावा.
सर्व साहित्य व्यवस्थित लावल्यावर रोल घडी करा म्हणजे ते एक रोलच्या आकारात येईल.
तयार एग रोल गरम गरम चटणी किंवा केचप सोबत सर्व्ह करा.