प्रथम प्रॉन्स धुऊन स्वच्छ करा
Picture Credit: iStock
एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, चिमूटभर बेकिंग सोडा आणि मीठ घाला. थंड पाणी आणि फेटलेला अंड्याचा पांढरा भाग घालून हलकेसे ढवळा.
एका खोलगट पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल पुरेसं गरम झालं पाहिजे पण धूर येईपर्यंत नाही.
प्रत्येक प्रॉन्स बॅटरमध्ये बुडवून लगेच तळण्यासाठी तेलात सोडा.
प्रॉन्स हलक्या सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेले प्रॉन्स टिश्यू पेपरवर ठेवा जेणेकरून जास्तीचं तेल निघून जाईल.
गरम गरम प्रॉन्स टेम्पुरा सोबत चिली सॉस किंवा टेम्पुरा डिपिंग सॉससह सर्व्ह करा.