Published On 28 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
सामोसा हे एक असे स्ट्रीट फूड आहे जे सर्वांनाच खायला फार आवडते
अनेकदा घरी आलेल्या पाहुण्यांना नाश्त्यासाठी सामोसे सर्व्ह केले जातात
स्ट्रीट स्टाईल खुसखुशीत आणि कुरकुरीत सामोसे घरी तयार करणे फार सोपे आहे
मैदा, ओवा, मीठ, तेल, उकडलेले बटाटे, हळद, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, जिरे, मिरची पेस्ट, हिंग, मटार, कोथिंबीर इ.
यासाठी प्रथम मैद्याच्या पिठात मीठ, ओवा आणि हलके पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या
कढईत तेल टाकून त्यात जिरे, कडीपत्ता, हिंग, आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या
त्यानंतर यात मॅश केलेले बटाटे, मटार, मीठ, गरम मसाला, हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून शिजवून घ्या
आता मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून लाटा आणि मधून कापून फोल्ड करत याला त्रिकोणी आकरा द्या
या त्रिकोणात सारण भरा आणि कडा बंद करून तयार सामोसा गरम तेलात छान तळून घ्या
सामोसे मध्यम आचेवर तळावे जेणेकरून ते चांगले तळले जातील आणि खुसखुशीत बनतील