सोया चंक्सपासून बनवा ही कुरकुरीत डिश

Life style

25 September, 2025

Author:  नुपूर भगत

एका पातेल्यात पाणी उकळून त्यात चिमूटभर मीठ घालून सोया चंक्स टाका. ५ मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा.

सोया चंक्स उकळणे

Picture Credit: Pinterest

उकळलेले सोया चंक्स गाळून थंड पाण्याने धुवा. हाताने हलके दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.

पाणी काढून दाबणे

Picture Credit: Pinterest

एका वाडग्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबूरस आणि थोडा कॉर्नफ्लोअर मिसळा. काढा.

मसाला तयार करणे

Picture Credit: Pinterest

तयार मसाल्यात सोया चंक्स टाकून चांगले मिक्स करा. १५-२० मिनिटे बाजूला ठेवा म्हणजे मसाला आत शोषला जाईल.

सोया चंक्स मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या प्लेटमध्ये कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचे पीठ घ्या. मॅरिनेट केलेले सोया चंक्स हलकेसे त्यात घोळवा.

तळण्यासाठी तयारी

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर सोया चंक्स सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.

सोया चंक्स तळणे

Picture Credit: Pinterest

गरमागरम क्रिस्पी सोया चंक्स टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest