एका भांड्यात राजगिरा पीठ घ्या. त्यात थोडे मीठ आणि गरम पाणी घालून मऊसर पण घट्टसर पीठ मळा. झाकून १० मिनिटे बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्या. त्यात शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे, मीठ आणि थोडी साखर घाला.
Picture Credit: Pinterest
सारणात लिंबूरस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे मिश्रण नीट एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळा हातावर थापून छोटी पुरी तयार करा.
Picture Credit: Pinterest
पुरीच्या मधोमध बटाट्याचे सारण ठेवा. कडा एकत्र करून हलक्या हाताने बंद करा आणि पुन्हा थोडेसे थापा देऊन गोल आकार द्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तूप किंवा शेंगदाणा तेल गरम करा. मध्यम आचेवर कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम कचोरी दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत वाढा.
Picture Credit: Pinterest