झटपट तयार होणारी पॅन पिझ्झाची रेसिपी!

Life style

10 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

कोमट पाण्यात साखर व यीस्ट मिसळा आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. फसफस झालं की यीस्ट तयार.

यीस्ट एक्टिवेट करा

Picture Credit: Pinterest

मैदा, मीठ, यीस्ट मिश्रण आणि तेल घालून मऊ पीठ मळा. 1-2 तास झाकून ठेवा, जेणेकरून ते फुलून येईल.

 पीठ मळा

Picture Credit: Pinterest

फुललेलं पीठ घेऊन गोळा तयार करा आणि पॅनच्या आकाराप्रमाणे हलकं हाताने थापून बेस तयार करा.

 बेस तयार करा

Picture Credit: Pinterest

नॉनस्टिक पॅनला थोडं तेल लावा. त्यात बेस ठेवा आणि झाकण ठेवून एक बाजू मध्यम आचेवर 3-4 मिनिटे भाजा.

पॅनमध्ये शिजवा

Picture Credit: Pinterest

भाजलेल्या बाजूवर पिझ्झा सॉस पसरवा. त्यावर चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर, चीज आणि चिली फ्लेक्स लावा.

सॉस आणि टोपींग लावा

Picture Credit: Pinterest

पॅनमध्ये झाकण ठेवून, एकदम मंद आचेवर 8-10 मिनिटे चीज मेल्ट होईपर्यंत शिजवा.

चीज मेल्ट करा

Picture Credit: Pinterest

गरमागरम पॅन पिझ्झा तुकडे करून चवीनुसार सॉससह सर्व्ह करा!

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest