दुधीभोपळ्यापासून घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा पेठा

Life style

17 August, 2025

Author:  नुपूर भगत

दुधीची साल काढून त्यामधील बिया काढा आणि त्याचे चौकोनी किंवा लांबट तुकडे करा.

दुधीची तयारी

Picture Credit: Pinterest

तुकडे २-३ तास चुना पाण्यात भिजवा. यामुळे तुकडे घट्ट राहतात आणि शिजल्यानंतर मोडत नाहीत.

 चुना पाण्यात भिजवणे

Picture Credit: Pinterest

भिजवलेले तुकडे स्वच्छ पाण्यात ३-४ वेळा धुऊन घ्या जेणेकरून चुना पूर्णपणे निघून जाईल.

भिजवलेले तुकडे धुवा

Picture Credit: Pinterest

एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात हे तुकडे ५-७ मिनिटे शिजवा. तुकडे पारदर्शक दिसू लागले की काढून घ्या.

तुकडे उकळवा

Picture Credit: Pinterest

वेगळ्या पातेल्यात साखर व पाणी घेऊन पाक बनवा. पाक एकतारी झाला की त्यात दुधीचे तुकडे घाला.

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

तुकडे पाकात नीट मुरल्यावर त्यात वेलदोडा पावडर व गुलाब पाणी घाला. हवे असल्यास थोडा केशरही वापरू शकता.

 सुगंध आणि चव

Picture Credit: Pinterest

पेठ्याचे तुकडे थंड होऊ द्या. हे गोड पदार्थ हवाबंद डब्यात ठेवून अनेक दिवस साठवता येतात.

साठवून ठेवा

Picture Credit: Pinterest