केशराच्या काड्या कोमट दुधात १० मिनिटे भिजत ठेवा, जेणेकरून त्याचा रंग आणि सुगंध दुधात व्यवस्थित उतरेल.
Picture Credit: Pinterest
कढईत दूध आणि मिल्क पावडर घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
मिश्रणात साखर आणि तूप घालून मंद आचेवर सतत ढवळत शिजवा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात केशराचे दूध आणि वेलची पूड घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत ढवळा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण कढईच्या कडांपासून सुटू लागले आणि घट्ट गोळ्यासारखे होऊ लागले की गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला हलके दाबून पेढ्याचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
तयार पेढ्यांवर पिस्त्याचे काप लावून सजवा. पूर्णपणे थंड झाल्यावर केसर पेढे सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest