दिवाळीची सुरुवात 5 नोव्हेंबर रोजी वसुबारसने होणार आहे.
Picture Credit: Pinterest
किसलेला नारळ आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून मंद आचेवर परता. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड घाला. थंड झाल्यावर लाडू वळा. अवघ्या १५ मिनिटांत तयार होणारी ही मिठाई सर्वांना आवडेल.
Picture Credit: Pinterest
घट्ट चक्का, पिठीसाखर आणि वेलची पूड एकत्र फेटून घ्या. त्यात केशर आणि सुका मेवा घाला. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. पुरीसोबत सर्व्ह करण्यासाठी स्वादिष्ट श्रीखंड तयार!
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
चॉकलेट, कंडेन्स्ड मिल्क आणि बिस्किटाचा चुरा एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. मोदकाच्या साच्यात भरून आकार द्या. काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर चॉकलेट मोदक सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
बिया काढलेले खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे मिसळा. मिश्रणाचा रोल बनवून फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर गोल काप करून पाहुण्यांना सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
ब्रेडच्या कडा कापून त्यावर घट्ट रबडी किंवा गोड दूध पसरवा. त्यात बदाम-पिस्त्याचे काप घालून रोल तयार करा. वरून केशर आणि सुका मेवा घालून थंड सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
नारळाचे लाडू, श्रीखंड, चॉकलेट मोदक, खजूर रोल आणि ब्रेड मलाई रोल… या झटपट मिठायांनी दिवाळीचा गोडवा आणखी वाढवा. कमी वेळात तयार होणाऱ्या या पदार्थांनी पाहुण्यांचे खास स्वागत करा!