पातळ पोहे, शेंगदाणे, डाळं, कढीपत्ता आणि मसाल्यांपासून तयार होणारा चिवडा हा फराळातील आवडता पदार्थ. चहासोबत त्याची चव आणखी खुलते.
Picture Credit: Pinterest
भाजणीच्या पिठापासून बनवलेली गोलाकार, खुसखुशीत चकली दिवाळीच्या फराळाची खास ओळख आहे. तिखट आणि मसालेदार चकली सगळ्यांनाच आवडते.
Picture Credit: Pinterest
नारळ, साखर, खसखस आणि सुका मेवा यांचे सारण भरून तयार केलेली करंजी गोड फराळातील लोकप्रिय पदार्थ आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
मैदा, साखर आणि तुपापासून तयार होणारी शंकरपाळी खुसखुशीत आणि गोड असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची ती आवडती.
Picture Credit: Pinterest
भाजलेल्या बेसनाचा सुगंध, तूप आणि साखरेचा गोडवा यांचा सुंदर संगम म्हणजे बेसनाचे लाडू. दिवाळीच्या फराळात त्यांना खास स्थान असते.
Picture Credit: Pinterest
तांदूळ आणि गुळापासून तयार होणारे अनारसे महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ आहेत. खसखस लावलेले अनारसे दिवाळीच्या फराळाची शोभा वाढवतात.
Picture Credit: Pinterest
बेसनापासून तयार होणारी बारीक, कुरकुरीत शेव चिवडा आणि इतर फराळाच्या पदार्थांसोबत छान लागते. तिखट शेव फराळाच्या ताटाला पूर्णत्व देते.