केस गळती बंद करण्यासाठी घरामध्ये बनवा हे तेल 

Life style

23 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

हिवाळ्यामध्ये केस खराब होऊ शकतात. कोरडी, केस गळती आणि कोंडा होणे. अशा वेळी घरामध्ये बनवा नैसर्गिक तेल

हिवाळ्यातील केसगळती

घरामध्ये तयार केलेले तेल केस हेल्दी ठेवण्यास मदत करते आणि याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. जाणून घ्या घरगुती तेल कसे बनवायचे 

नैसर्गिक  तेल

मेथी आणि बदामाचे तेल 

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. नंतर ते बदामाच्या तेलात मिक्स करा. मेथीमध्ये प्रथिने आणि आयरन असते. जे केस मजबूत ठेवून केस गळती थांबते.

आवळा आणि ऑलिव्ह ऑइल

सर्वांत पहिले आवळ्याची पावडर तयार करून घ्या. ही पावडर ऑलिव्ह ऑइल मिसळून घ्या. आवळ्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण असते. जे केस काळी आणि चमकदार ठेवतात.

कापूर आणि एरंडेल

केस मजबूत करण्यासाठी कापूर आणि एरंडेल तेल फायदेशीर आहे. यासाठी कापूर, एरंडेल आणि ऑलिव्ह ऑइल गरम करून केसांना लावा.

कांदा आणि नारळाचे तेल

केस वाढण्यासाठी कांदा आणि नारळाच्या तेलाचा वापर करावा. हे तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये नारळाचे तेल घ्या आणि  त्यात कांदा टाकून शिजवा. थंड झाल्यावर केसांवर लावा

कढीपत्ता आणि नारळाचे तेल 

नारळाच्या तेलामध्ये दोन थेंब ट्रीट्री तेल टाका. कढीपत्त्याची पाने सुकवून गॅसवर भाजवून घ्या. ते गाळून बाटलीत भरा. हे कोंडा कमी करण्यासोबतच चमकदार बनवते