Published Feb 16, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
मराठी टिव्ही इंडस्ट्री आणि सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवची गणना केली जाते.
सायलीने मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सायलीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंची सध्या चर्चा होते.
“Valentine’s isn’t just a day- it’s an Utsaav! And this year, the love story starts with you... So make har pal utsaav ka – bold, beautiful and unapologetically you.” शेअर केलेल्या फोटोंना सायलीने असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा सुंदर वेस्टर्न ड्रेस वेअर केला आहे.
वेअर केलेल्या ड्रेसवर अभिनेत्रीने खास ज्वेलरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सायली संजीवच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.