अभिनेत्री अश्विनी महांगडे हिला अनेक टिव्ही सीरियलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आहे.
Picture Credit: Instagram
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अश्विनी सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील सुंदर फोटो शेअर केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगली चर्चा होत आहे.
फोटोंमध्ये अश्विनीने सुंदर साडी केसात गजरा आणि गळ्यात तन्मणी हार परिधान करुन साजशृंगार केलेला दिसत आहे.
अभिनेत्रीने केलेल्या फॅशनचे आणि लूकचेही चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
'अपनी जिंदगी के चित्रकार खुद बने, जो रंग मन को भाये वही भरे...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
बिस्किट कलरची सिंपल साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले.
शेअर केलेल्या फोटोंमधील फोटो पोजेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
आश्विनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.