Xerox ला मराठीत काय म्हणतात?

lifestyle

 19 September, 2025

Author: मयूर नवले

आपण अनेकदा कामानिमित्त स्टेशनरीच्या दुकानात जाऊन झेरॉक्स काढत असतो.

झेरॉक्स 

Picture Credit: Pinterest

झेरॉक्स हा शब्द इतका जास्त वापरला जातो की आपण फोटो कॉपी हा शब्द विसरलो आहोत.

रोज वापरला जाणारा शब्द

मात्र, गमंत अशी की झेरॉक्स हे एका अमेरिकन कंपनीचे नाव आहे ज्यांनी कॉपी मशिन्सचे साम्राज्य उभे केले.

झेरॉक्स म्हणजे  फोटो कॉपी नव्हे

चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकाने झेरोग्राफी प्रक्रिया शोधली. 

असा आहे इतिहास

पुढे या तंत्रज्ञानावर आधारित Xerox 914 नावाचे कॉपीयर मशीन आले आणि झेरॉक्स शब्द ओळखीचा झाला.

झेरॉक्स शब्द ओळखीचा झाला

मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की Xerox ला मराठीत काय म्हणतात?

मराठीत काय म्हणतात?

झेरॉक्सला मराठीत 'छायाप्रत' आणि 'प्रतिमुद्रा' असे शब्द आहेत. 

अवघड शब्द