मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणते उपाय करायचे जाणून घ्या 

Life style

04 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू देवी, लक्ष्मी आणि चंद्राची देखील विशेष पूजा केली जाते.

काय आहे महत्त्व

याशिवाय विष्णू आणि देवी लक्ष्मी साठी या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी आहे 

कधी आहे 

काय करावे 

ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी काय उपाय करायचे ते सांगण्यात आले आहेत जाणून घ्या

स्नान करणे

पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीत, तलाव या ठिकाणी स्नान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

लक्ष्मी स्तोत्राचे पठण 

पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे म्हटले जाते की पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने धनलाभ होतो

चंद्र देवाचे दर्शन 

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाचे दर्शन घेतल्याने आणि पूजा केल्याने व्यक्तीचे मन संतुलित आणि शांत होते. शिव्या कुंडलीतील दोषही नाहीसा होतो 

कमळ अर्पण करा 

देवी लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे. यामुळे पौर्णिमेच्या दिवशी कमळ अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

उपाय 

पौर्णिमेच्या दिवशी 11 कौडी घ्या आणि त्यावर हळद टाका. त्यानंतर ते देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये अर्पण करा. 

उत्पन्नात वाढ 

यानंतर विधीपूर्वक पूजा करावी आणि लक्ष्मी चालिसाचे पठन करावे. असे केल्याने उत्पन्नात वाढ होईल