या ५ गाड्यांची झाली जबरदस्त विक्री

Automobile

20 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गाड्यांची तुफान विक्री

सध्या पेट्रोलचे वाढलेले दर आणि सतत मायलेजची चिंता असे असून देखील काही गाड्यांची तुफान विक्री झाली. 

Picture Credit: Pinterest

५ हायब्रीड गाड्यांची यादी

चला तर जाणून घेऊया सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप ५ हायब्रीड गाड्यांची यादी.

Picture Credit: Pinterest

मारुती इनव्हिक्टो

जून महिन्यात इनव्हिक्टोच्या एकूण ३४९ युनिट्सची विक्री झाली. जी मे महिन्यात ३०१ झाली होती. युनिट्सच्या तुलनेत १६% वाढ आहे. ही ७ सीटर कार २३.१४ किमी/लीटरचे मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

मारुती व्हिक्टरी

जून महिन्यात व्हिक्टरच्या एकूण ५१५ युनिट्सची विक्री झाली. जी मे महिन्यात विकल्या गेलेल्टा २६९ युनिट्सच्या तुलनेत ९१.४% वाढ झाली. ही कार २८.६५ किमी/लीटर मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

मारुती ग्रँड व्हिटारा

ग्रँड व्हिटाराच्या एकूण ७२३ युनिट्सची विक्री झाली. जी मे महिन्यात विकल्या गेलेल्या ५९४ युनिट्सच्या तुलनेत २१.७% वाढ आहे. याचा हायब्रीड व्हेरिएंट २७.९७ किमी/लीटरचे मायलेज देतो.

Picture Credit: Pinterest

इनोव्हा हायक्रॉस

जूनमध्ये एकूण २,७०२ युनिट्सची विक्री झाली, जी मे महिन्यात विकल्या गेलेल्या ४,२४० युनिट्सच्या तुलनेत ३६.३% घट आहे. ही हायब्रीड कार २३.२४ किमी/लीटरचे मायलेज देते.

Picture Credit: Pinterest

टोयोटा हायरायडर

हायरायडरचे एकूण ३,५५० युनिट्स विकले गेले, जे मे महिन्यात विकल्या गेलेल्या ३,१२३ युनिट्सपेक्षा १३.७% नी जास्त आहे. ही हायब्रीड कार २८ किमी/लीटरचे मायलेज देते.

Picture Credit: Pinterest