मुलींच्या जन्माचे दर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना एकरकमी ५०,००० रुपये दिले जातात.
मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत दरवर्षी पैसे दिले जातात.
या योजनेत गरीब कुटुंबातील मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे.१ एप्रिल २०१६ रोजी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
ज्या कुटुंबाचे उत्पन्न ७.५ लाखांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेत मुलीच्या जन्मानंतर जर आईवडिलांनी परिवार नियोजन केले तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुलीच्या कुटुंबाच्या नावावर ५०,००० रुपये जमा केले जाणार आहेत.
या योजनेत मुलींच्या नावावर १ लाखांचा अपघात विमा मिळणार आहे.
या योजनेत एका कुटुंबातील फक्त २ मुलींनाच मदत मिळणार आहे.