Published Oct 14, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
वाहनांच्या नंबर प्लेटचा रंग वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो.
ही नंबर प्लेट खासगी वाहनांसाठी असते. सामान्य नागरिक पांढरी नंबर प्लेट वापरू शकतात.
ही नंबर प्लेट व्यावसायिक वाहनांसाठी असते. टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रक यांसारख्या वाहनांसाठी पिवळी नंबर प्लेट वापरली जाते
लाल नंबर प्लेट केवळ राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वाहनांवर वापरली जाते. या नंबर प्लेटवर संख्यांऐवजी अशोकचिन्ह लावण्यात आले आहे.
ही नंबर प्लेट इलेक्ट्रिक वाहनांसाठी असते. हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाचे आकडे असलेली वाहने खासगी इलेक्ट्रिक वाहने असतात.
.
तर पिवळ्या रंगाचे आकडे असलेली वाहने व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहने असतात.
भाड्याने घेतलेल्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट वापरली जाते.
देश-विदेशातील अनेक वाहनांवर निळ्या रंगाच्या नंबर प्लेट असतात, तसेच त्यावर वेगवेगळे नंबर दिले जातात.