₹63 लाखांची MINI Stardust Edition आली! जाणून घ्या काय आहे खास

Automobile

29 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

MINI ने आपल्या Convertible ला Stardust Edition या खास अवतारात सादर केले आहे. मर्यादित संख्येत उपलब्ध असलेली ही कार प्रीमियम लुक आणि वेगळ्या ओळखीमुळे लक्ष वेधून घेत आहे.

आली खास Stardust Edition!

Picture Credit: MINI

आकर्षक पेंट फिनिश, खास स्टाइलिंग एलिमेंट्स आणि MINI ची सिग्नेचर डिझाइन या एडिशनला इतर मॉडेल्सपेक्षा वेगळी ओळख देतात.

नजरा खिळवणारे डिझाइन

Picture Credit: MINI

इलेक्ट्रिक सॉफ्ट-टॉप रूफ फक्त 18 सेकंदांत उघडता येते. कमी वेगात कार चालू असतानाही रूफ ऑपरेट करता येते.

18 सेकंदांत उघडते रूफ!

Picture Credit: MINI

2.0-लिटर MINI TwinPower Turbo पेट्रोल इंजिन 204hp पॉवर आणि 300Nm टॉर्क निर्माण करते. 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.

दमदार टर्बो पेट्रोल इंजिन

Picture Credit: MINI

गोल OLED डिस्प्ले, MINI Intelligent Personal Assistant, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात.

प्रीमियम इंटीरियर

Picture Credit: MINI

मल्टिपल एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पार्किंग असिस्ट आणि आधुनिक ड्रायव्हर सहाय्यक फीचर्स सुरक्षित प्रवास सुनिश्चित करतात.

सुरक्षिततेवर भर

Picture Credit: MINI

लक्झरी, स्टाइल आणि ओपन-एअर ड्रायव्हिंगचा अनुभव एकाच कारमध्ये हवा असेल, तर MINI Cooper Convertible Stardust Edition तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

कोणासाठी योग्य?

Picture Credit: MINI

युनिक डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि मर्यादित उपलब्धता यामुळे ही एडिशन कलेक्टर आणि लक्झरी कार प्रेमींसाठी विशेष ठरते.

MINI चाहत्यांसाठी खास आकर्षण

Picture Credit: MINI