Published Sept 13, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
फेसपॅक लावताना टाळा चुका, अन्यथा त्वचा लटकेल
चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावर फेसपॅक लावणे सौंदर्यासाठी गालबोट ठरू शकते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी काय करावे
फेसपॅकचा वापर करण्यापूर्वी आपल्या स्किन टाईपबाबत जाणून घ्या. संवेदनशील त्वचेवर जास्त वेळ फेसपॅक वापरू नये
संवेदनशील त्वचेवर केवळ 10-15 मिनिट्स Face Pack लावावे, अन्यथा नुकसान होईल
.
ग्लोईंग स्किनसाठी महिला अनेकदा लागोपाठ वेगवेगळे फेसपॅक लावतात, जे चुकीचे आहे कारण यामुळे त्वचा कोरडी पडते
.
तुम्ही घरगुती फेसपॅक वापरत असाल तर आठवड्यातून केवळ 2 वेळा चेहऱ्यावर लावा. तसंच केवळ 1 कोटच वापरा
फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. कारण हाताची घाण चेहऱ्यावरील त्वचेच्या आत जाऊ शकते
चुकीच्या दिशेने फेसपॅक लाऊ नका. वरून खालच्या बाजूला फेसपॅक लावल्यास त्वचा लटकू शकते
नेहमी फेसपॅक हाताच्या बोटांनी चेहऱ्याच्या खालच्या बाजूंनी वरच्या बाजूला लावावे. यामुळे कसावट चांगली राहते
कोणत्याही फेसपॅकचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, आम्ही कोणताही दावा करत नाही