2021 मध्ये बंद झालेली Mitsubishi Pajero आता 5 वर्षांनी नव्या अवतारात परतली आहे. कंपनीने पाचव्या जनरेशनच्या SUVचे ग्लोबल अनावरण केले.
Picture Credit: pinterest
नवीन Pajeroला अधिक रग्गड आणि मॉडर्न डिझाइन मिळाले आहे. बॉक्सी स्टाइल, मोठी ग्रिल आणि दमदार व्हील आर्चेस SUVला जबरदस्त रोड प्रेझेन्स देतात.
Picture Credit: pinterest
नवीन Pajeroमध्ये 2.4-लिटर Clean Diesel Engine देण्यात आले आहे. हे इंजिन तब्बल 480Nm टॉर्क जनरेट करते आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडले आहे.
Picture Credit: pinterest
Pajeroमध्ये 4WD सिस्टीमसह 2H, 4H, 4HLc आणि 4LLc असे ड्राइव्ह मोड्स मिळतात. ऑफ-रोडिंगसाठी Rock, Sand, Mud, Snow यांसह 7 ड्राइव्ह मोड्सही आहेत.
Picture Credit: pinterest
खडतर रस्ते आणि ऑफ-रोडिंगसाठी 230mm Ground Clearance देण्यात आला आहे. 2,870mm Wheelbaseमुळे SUVला मोठा आणि मजबूत लूक मिळतो.
Picture Credit: pinterest
नवीन Pajeroमध्ये आधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजीसह प्रीमियम केबिन मिळते. ही SUV 7-सीटर असून तीन रांगा आणि कुटुंबासाठी प्रशस्त केबिन देण्यात आले आहे.
Picture Credit: pinterest
Ladder-frame चेसिस, Diesel Engine आणि 4WD यामुळे Pajeroची थेट स्पर्धा मजबूत ऑफ-रोड SUVशी होऊ शकते. त्यामुळे Toyota Fortunerसारख्या SUVसमोर ही नवी आव्हानात्मक एंट्री ठरू शकते.
Picture Credit: pinterest
Mitsubishiने सुरुवातीला Thailandमध्ये Pajeroचे उत्पादन आणि लॉन्च करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर Japan आणि Australiaमध्ये विस्तार केला जाणार आहे. भारतातील लॉन्चबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
Picture Credit: pinterest
रग्गड 4WD, 480Nm Diesel Power, 230mm Ground Clearance आणि 7-सीटर केबिनमुळे नवीन Pajeroने SUV मार्केटमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण केली आहे. आता सर्वांच्या नजरा भारताच्या लॉन्चकडे लागल्या आहेत!
Picture Credit: pinterest