भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठी झेप! TVS, Bajaj, Ather आणि Vida यांनी मिळून 2026च्या पहिल्या 8 महिन्यांत 10 लाखांहून अधिक ई-स्कूटर विकल्या.
Picture Credit: pinterest
जानेवारी ते ऑगस्ट 2026 दरम्यान या चार कंपन्यांची एकत्रित विक्री 10,38,973 युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच कालावधीत 5,65,635 युनिट्सची विक्री झाली होती.
Picture Credit: pinterest
या चार कंपन्यांच्या विक्रीत वर्षभराच्या तुलनेत तब्बल 84 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात झालेली 9,22,824 युनिट्सची विक्रीही त्यांनी 2026मध्ये ऑगस्टपर्यंतच मागे टाकली.
Picture Credit: pinterest
TVS Motor या शर्यतीत आघाडीवर आहे. जानेवारी-ऑगस्ट 2026 मध्ये कंपनीने 3,56,579 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स विकल्या. ई-टू-व्हीलर मार्केटमध्ये TVSचा वाटा सुमारे 26% आहे.
Picture Credit: pinterest
Bajaj Autoने Chetakच्या जोरावर 3,05,226 युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या विक्रीत वर्षागणिक 69% वाढ झाली असून Bajajचा बाजारातील वाटा सुमारे 22% आहे.
Picture Credit: pinterest
Ather Energyने जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 2,29,099 इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स विकल्या. कंपनीची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत 83% वाढली असून बाजारातील हिस्सा 17% झाला आहे.
Picture Credit: pinterest
Hero MotoCorpची Vida ब्रँडही वेगाने पुढे येत आहे. पहिल्या 8 महिन्यांत Vidaने 1,48,069 युनिट्स विकल्या. विशेष म्हणजे विक्रीत तब्बल 151% YoY वाढ झाली आहे.
Picture Credit: pinterest
2026 जानेवारी-ऑगस्ट विक्री: TVS – 3.56 लाख Bajaj – 3.05 लाख Ather – 2.29 लाख Vida – 1.48 लाख या चार कंपन्यांचा मिळून भारतातील ई-टू-व्हीलर विक्रीत सुमारे 76% वाटा आहे.
Picture Credit: pinterest
याच कालावधीत भारतात एकूण 13.6 लाख इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची विक्री झाली. मार्केटची हीच गती कायम राहिल्यास 2026 मध्ये देशातील ई-टू-व्हीलर विक्री 20 लाखांचा टप्पा गाठू शकते.
Picture Credit: pinterest
TVS, Bajaj, Ather आणि Vidaच्या विक्रीचे आकडे पाहता भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वेगाने वाढत असल्याचे दिसते. आता उरलेल्या चार महिन्यांत कोणता ब्रँड वर्षअखेरीस नंबर-1 राहतो, याकडे ऑटो मार्केटचे लक्ष असेल!
Picture Credit: pinterest