Published 27, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खालिक हे केवळ 162 मतांच्या फरकाने विजयी झाले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भडांऱ्यातील साकोली मतदारसंघात केवळ 208 मतांनी विजय झाला.
बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संदीप नाईक यांचा केवळ 377 मतांनी पराभव केला.
संजय गायकवाड यांनी बुलढाणा मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा केवळ 841 मतांनी पराभव केला.
नंदुरबारमधील नवापूरमध्ये शिरीषकुमार नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित याच्यांवर 1121 मतांनी विजय मिळवला.
कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे प्रा.राम शिंदे यांच्याविरोधात केवळ 1243 मतांनी विजयी झाले.
माहिममधील चुरशीच्या लढतीत 1316 मतांनी महेश सावंत यांनी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांवर मात केली.
.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमध्ये केवळ 1523 मतांनी विजय मिळाला.
.