पावसात त्वचा स्वच्छ राखणे, मॉईस्चराईज करणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी काही खास स्किन केअर टिप्स तुम्ही जाणून घ्या
Picture Credit: iStock
पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि कोरडी होते. या असंतुलनासाठी त्वचेला हायड्रेट करणारे आणि पोषण देणारे सनस्क्रिन आणि मॉईस्चराईजर वापरावे
स्किन सेल्स हटविण्यासाठी आठवड्यातून १-२ वेळा स्क्रबरचा वापर करावा. यामुळे डेड स्किन जाऊन त्वचा अधिक उजळते
पावसाळ्यात दाढी आणि केस मोठे असतील तर कोंडा होण्याची समस्या असते आणि इन्फेक्शनही वाढू शकते. याची काळजी घ्यावी
कोरफड, मुलतानी माती आणि मधासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून DIY फेसपॅक लावावे. पावसाळ्यात त्वचेला अधिक पोषण देते
घरी आल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा. थंड टी बॅग्ज, काकडी स्लाईस डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांना सतत हात लाऊन इन्फेक्शन देऊ नका
पावसाळ्यात क्रिमऐवजी सीरमचा वापर करावा. हे त्वचेला पोषण आणि मऊपणा देते, तेलही नियंत्रित करते आणि त्वचा अधिक मुलायम बनवते
याशिवाय आपल्या डाएटमध्ये सर्व पावसाळी भाज्या, फळांचा समावेश करा आणि पुरेसे पाणी प्या
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही