पावसाच्या गार वातावरणात एकदा होऊन जाऊद्यात चीज मॅगीचा बेत

Lifestyle

28 May, 2025

Author: Nupur Bhagat

पावसाच्या थंड वातावरणात अनेकांना गरमा गरम मॅगी खायला फार आवडते, चला याला जरा ट्विस्ट देऊयात.

चीज मॅगी

Picture Credit: iStock

कढईत तेल किंवा बटर गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका. कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

 तेल गरम करा

टोमॅटो घालून २ मिनिटं परतून घ्या, तो मऊ होईपर्यंत.

 टोमॅटो घालून परता

आता त्यात १½ कप पाणी आणि मॅगी मसाला टाका आणि उकळू द्या.

मसाला घाला

पाणी उकळल्यावर मॅगी नूडल्स टाका आणि नीट ढवळा.

मॅगी नूडल्स घाला

मॅगी मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजू द्या, तोपर्यंत पाणी आर्धं आटेपर्यंत.

 शिजू द्या

आता किसलेले चीज त्यात टाका आणि ढवळून १ मिनिट शिजू द्या, जोपर्यंत चीज वितळून मॅगीत मिसळते.

चीज घाला

गरम गरम चीज मॅगी वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सर्व्ह करा