Published Dec 16, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की बॉलिवूडचे बहुतेक चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात.
साऊथमध्ये बहुतेक चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होतात.
चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हे दोनच दिवस का निवडले गेले तुम्हाला माहीत आहे का?
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे भारतात लोकांकडे रंगीत टीव्ही नव्हते, त्यामुळे लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचे.
स्वातंत्र्यापूर्वी चित्रपटसृष्टीत शुक्रवारी अर्धा दिवस सुट्टी असायची, जेणेकरून कर्मचारी कुटुंबियांसोबत चित्रपट पाहू शकतील.
याशिवाय शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो.
शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित केल्याने पैसे मिळतात आणि चित्रपट हीट होतात असा निर्मात्यांचा विश्वास आहे.
1940 च्या सुमारास हॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली.
गुरुवारी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.