Published Dec 12, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
पनीर, भाज्या आणि बेबी कॉर्न या सर्वांपासून सहसा पिझ्झा तयार केला जातो.
पिझ्झाची चव इतर पदार्थांपेक्षा आगळी वेगळी असते.
तुम्ही आतपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे महागडे पिझ्झे खाल्ले असतील.
साधारण बाजारात 100 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतचे पिझ्झा उपलब्ध आहेत.
आज आम्ही अशा पिझ्झाविषयी सांगणार आहोत ज्याची किंमत तुम्हाला हैराण करेल.
हा पिझ्झा इतका महाग आहे की एवढ्या पैशात कोणतीही नवीन आलिशान कार खरेदी करता येईल.
जगातील सर्वात महाग पिझ्झा इटलीतील सालेर्नो शहरात उपलब्ध आहे.
लुई लुई XIII असे या जगातील सर्वात महाग पिझ्झाचे नाव आहे.
त्याची किंमत 12000 डॉलर म्हणजेच सुमारे 10,18,229 इतकी आहे.
हा पिझ्झा बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.
हा पिझ्झा ऑरगॅनिक अरब पिठापासून बनवला जातो. यासाठी 72 तास अगोदर पीठ मळून घेतले जाते.
ऑस्ट्रेलियाच्या मुरी नदीतून आणलेल्या खास गुलाबी मीठाचा या पिझ्झामध्ये वापर केला जातो.