जगात लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
Picture Credit: Pexels
आता जगातील लोकसंख्येने 8 अब्जाचा आकडा पार केला आहे.
आता असाही अनुमान वर्तविला जात आहे की जगात ही लोकसंख्या वाढतच राहणार आहे.
अनेक जण गाव सोडून शहरात स्थायिक होत असतात, ज्यामुळे शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की जगातील कोणत्या शहरात जास्त लोकसंख्या आहे.
माहितीनुसार, जगात सर्वात जास्त लोकं टोकियो शहरात राहतात.
2024 च्या आकडेवारीनुसार टोकियो शहरात 3 कोटी 71 लाख 15 हजार 35 लोक राहतात.
लोकसंख्येबाबत टोकियोनंतर राजधानी दिल्लीचा नंबर लागतो.ज्याची लोकसंख्या 2024 मध्ये 3,38,07,403 होती.