Written By: Mayur Navle
Source: Yandex
आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने अनेक जण आपल्या आईसोबतचे फोटोज शेअर करत असतात.
पण आईचं प्रेम हे इतर प्रेमापेक्षा विशेष का असते? चला याबद्दल जाणून घेऊया.
आई आपल्या लेकरांसाठी कोणताही त्याग करायला तयार असते. ती नेहमीच स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांचं भलं पाहते.
आईचं प्रेम कोणत्याही अटीशिवाय असतं. चूक-योग्य, यश-अपयश यापलीकडे जाऊन ती कायम आपल्या मुलावर प्रेम करते.
आई आपल्या मुलाच्या भावना ओळखून त्याला समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करते.
आई ही मुलांची पहिली गुरु असते. ती नेहमीच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते.
आईचा आशीर्वाद आणि प्रोत्साहन कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ देतो.