फ्रिज Shift केल्यानंतर किती वेळ बंद ठेवायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Science Technology

22 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

फ्रिज हलवताना तो तिरका किंवा आडवा झाला असेल, तर Compressorमधील तेल हलू शकतं. त्यामुळे लगेच वीज जोडण्याऐवजी थोडा वेळ थांबणं सुरक्षित ठरतं.

घाई का करू नये?

Picture Credit: pinterest

फ्रिज पूर्णपणे सरळ (upright) ठेवून हलवला असेल, तर साधारण 2 ते 4 तास उभा ठेवून सुरू करता येतो.

फ्रिज सरळ ठेवून नेला असेल तर?

Picture Credit: pinterest

Transport करताना फ्रिज बराच वेळ आडवा किंवा जास्त तिरका झाला असेल, तर 12 ते 24 तास उभा ठेवणे अधिक सुरक्षित पर्याय आहे.

फ्रिज आडवा झाला असेल तर?

Picture Credit: pinterest

सामान्य परिस्थितीत 2-3 दिवस फ्रिज बंद ठेवण्याची गरज नसते. मात्र, तुमच्या फ्रिजच्या कंपनीच्या User Manualमध्ये वेगळी सूचना असल्यास तीच पद्धत पाळा.

2-3 दिवस थांबायची गरज आहे?

Picture Credit: pinterest

फ्रिज सुरू केल्यानंतर आत योग्य तापमान तयार होण्यासाठी काही वेळ द्या. विशेषतः दूध, भाज्या आणि इतर नाशवंत पदार्थ लगेच भरू नयेत.

ON केल्यानंतर लगेच सामान भरू नका

Picture Credit: pinterest

फ्रिजला भिंतीपासून योग्य अंतर ठेवा आणि हवेशीर जागा निवडा. Compressorभोवती हवा खेळती राहिल्यास उष्णता बाहेर जाण्यास मदत होते.

फ्रिज कुठे ठेवला हेही महत्त्वाचं!

Picture Credit: pinterest

Shift करताना फ्रिज किती वेळ आडवा/तिरका होता, यावर प्रतीक्षा वेळ बदलू शकतो. त्यामुळे शंका असल्यास कंपनीच्या Manualमधील सूचना तपासा.

एक महत्त्वाची गोष्ट!

Picture Credit: pinterest

सरळ नेला → 2–4 तास आडवा/जास्त तिरका नेला → 12–24 तास फ्रिज सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ उभा ठेवणे ही महत्त्वाची खबरदारी आहे.

लक्षात ठेवा!

Picture Credit: pinterest